शहापूर बेळगाव : येथे मंगळागौरी पूजन आणि गणेशोत्सव चा विविध कार्यक्रमाने ग्रंथ हेच गुरु आणि वाचनाचे महत्त्व वाचाल तर वाचाल अशा आशयाला धरून मंगळागौरी पूजन करण्यात आले यावेळी विविध भाषांमधील विविध प्रकारचे पुस्तके आणि त्याच्या आतील मजकूर ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे असं सांगणारा विषय या ठिकाणी आहे विविध आसनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळी विविध फुलांनी सजवलेला गणेशोत्सव चा मंडप आणि त्या ठिकाणी असलेले आरास तसेच विविध फराळ संत ज्ञानेश्वरी तुकोबा ज्ञानोबा यांनी लिहिलेली अतिशय महत्त्वाचे ग्रंथ ठेवून ग्रंथांचे महत्त्व वाचनाचे महत्त्व आणि ज्ञानाचे महत्त्व पटवून देणारे आरास या ठिकाणी करण्यात आले होते विशेष वेगळ्या अनोख्या पद्धतीने घरच्या गणपती उत्सवामध्ये विशेष आरास करून सगळ्यांचे गणेश उत्सव भक्तांचे मन वेधून घेतलेले आहे. कथा कादंबरी नाटक प्रवास वर्णन ललित कथा स्पोर्ट लेखन धर्मग्रंथ वांग्मय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक उद्योग कला क्रीडा साहित्य ग्रामीण साहित्य लोकसाहित्य धर्मशास्त्र संत ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत आणि आधुनिक कथा कविता यांच्यासह साहित्याची मेजवानी साहित्यातून नवा उत्कर्ष कसा सांगता येईल. शहापूर बेळगांव येथील अंजली गोडसे, अंजली शिर्के, स्मिता शिंदे, पी. एस.पाटील, शिल्पा बोगरे, वर्षा चव्हाण, शोभा देगनोळी, निता पाटील, निता डौलतकर, वनिता सायानेकर, अरुणा कोळी, मेघा जाधव, ज्योती गवी, प्रतिभा माळगी, अनिता आचरेकर,
रेखा शिंदे, कुमुद शहाकर, आर व्ही. पाटील, प्रणिता खरात, गायत्री शिंदे, उज्वला पाटील, रेश्मा हुंद्रे यासह वेगवेगळ्या ठिकाणी सादर केलेला कला सांस्कृतिक कार्यक्रम लोककला आणि मंगळागौरीच्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
आधुनिक काळामध्ये दिवसेंदिवस बदलत जाणारी रिती रिवाज परंपरा आणि नव्या योजना.
धावपळीच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक ठिकाणी स्पर्धा चालू आहे या वेळेला अभ्यासाच्या क्षेत्र पाहिलं तर वाचन संस्कृती कुठेतरी लोक पावत चाललेली आहे असं आपल्याला वाटते आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकीच्या माध्यमातून होणारे वाचन संस्कृती कमी होताना हळूहळू दिसत आहे वाचनालय ऊस पडताना दिसत आहेत पण नव्या पिढीमध्ये संदेश देण्यासाठी गणेश चतुर्थीच्या गौरी गणपती उत्सवामध्ये एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळी व्हाट्सअप फेसबुक इंटरनेट इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आणि हळुवार पद्धतीने नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती कमी होताना दिसते आहे त्याची उणीव भरून काढण्यासाठी एक सामाजिक शैक्षणिक साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी हा नवा उपक्रम गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे बेळगाव येथील शहापूर या ठिकाणी एक अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला आहे त्यामुळे सर्वत्र या कुटुंबांचा अभिनंदन करत आहेत.
मंगळागौरी महिलांचे एक व्रत
एक पुस्तक शंभर पुस्तकांच्या बरोबर मित्र असते .मला सांगा आपल्या घरात जर हजारो पुस्तकातील तर आपल्याला किती मित्र झाले बर? हे मित्र आपल्याला हवे तेव्हा आपल्या मदतीला येतात आपण त्यांना बोलावू शकतो कारण ते आपल्या घरातच असतात .हे मित्र कधीच आपल्याशी वाईट वागत नाहीत नेहमीच आपलं ज्ञान तुम्हाला देत असतात .असे मित्र आपल्या घरात असायलाच पाहिजेत ना! म्हणूनच यावर्षी नाही तर दरवर्षीच सामाजिक संदेश देणाऱ्या आमच्या गौराई ह्या वेळेस वाचनाचे महत्त्व पटवून देत आहेत. वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य या फेसबुक पेज वरील समूहाने दहा हजार सदस्य संख्या पार केली. आणि या वाचन साखळी समूहाची मी एक छोटीशी सदस्य असल्यामुळे आणि नेहमीच इतरांना वाचण्याची प्रेरणा देण्यासाठी या सामाजिक संदेश पर देणाऱ्या देखाव्याची निवड केली. पुस्तकांचा खजिनाचा तर घरात होताच. त्यामुळे वेगळं काही करायची गरजच वाटली नाही आणि तीच पुस्तक महालक्ष्मी आणि सरस्वतीच्या पदकमलावर मांडली. आणि हळदी कुंकाला येणाऱ्या जाणाऱ्या माता भगिनींनी तेवढ्या वेळात का होईना चार शब्द वाचले. याच समाधान भरभरून दान देणार आहे म्हणून म्हणते वाचाल तरच वाचाल.
वाचनाच्या सवयी ज्वलंत कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह विकसित करतात.
वाचनाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याला ज्ञान मिळते. पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत आहे. विविध प्रकारच्या शैलींवरील पुस्तके वाचल्याने माहिती मिळते आणि आपण वाचलेल्या विषयाची सखोल माहिती मिळते. जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकता.
तेव्हा रोज थोडं तरी वाचलच पाहिजे
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात.
मंगळागौरी पूजन
सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात.मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते.
वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णूक्रांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात. पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्री देवीला अर्पण केल्या जातात.
मंगळागौर
मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात – लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात.[४] नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते.वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा – इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.
या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्याजोडीने गाणीही म्हणतात.मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिक जीवनाचा आनंद देणारे आहे.